आता ब्लॅकहेडस् काढा घरच्या घरी.. ‘हे’ उपाय आहेत सर्वात उत्तम

ब्लॅकहेड्स आपल्या नाकावर आणि कपाळावर धुळीच्या कणांमुळे निर्माण होतात. परंतु योग्य ती काळजी घेतल्यामुळे, ब्लॅकहेडस् कमी होऊ शकतात. अनेकदा नाक, हनुवटी, कपाळावर आपल्या ब्लॅकहेडस् दिसतात. त्यांना काढणे थोडे कठीण असते. खासकरून धावपळीच्या वेळापत्रकात महिलांना पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळेच आपण घरच्या घरी अगदी साधे सोपे उपाय वापरून ब्लॅकहेडस् काढू शकतो.

ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय देखील अवलंबू शकता. ब्लॅकहेड्समुळे बाहेर जातानाही कसेतरी वाटते. तसेच पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ नसल्यामुळे ब्लॅकहेड्स कसे काढायचे हा प्रश्न नक्कीच पडलेला असेल. पण अगदी घरच्या घरी साधे उपया करुनही ब्लॅकहेडस् पासून मुक्ती मिळू शकते. त्यामुळे नक्कीच हे साधे सोपे उपाय करुन बघा.

साखर आणि मध- दोन चमचे साखर घालून एक चमचा मध मिसळा. चेहऱ्यावर जिथे ब्लॅकहेडस् आहेत तिथे हे मिश्रण लावा. त्यानंतर त्या त्वचेला एक्सफोलिएट करण्यासाठी हलक्या हाताने मसाज करा. काही मिनिटांसाठी गोलाकार मसाज करा. त्यानंतर 8 ते 10 मिनिटांसाठी त्वचेवर तसेच राहू द्यावे. नंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा. ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी आठवड्यातून 2 ते 3 वेळा हा सोपा आणि घरगुती उपाय नक्की करून बघा.

ओट्स आणि ग्रीन टी- एक कप ग्रीन टी तयार करा. दरम्यान, ओट्स पावडर बनवण्यासाठी दोन चमचे ओटस् बारीक करा. एका वाडग्यात ओट्स पावडर घ्या आणि त्यात आवश्यक प्रमाणात ग्रीन टी घाला. एक पेस्ट तयार करा आणि त्वचेच्या ब्लॅकहेडस् असलेल्या भागावर लावा. एक्सफोलिएट करण्यासाठी हळूवारपणे आपल्या बोटांनी मालिश करा. त्यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवावा. 

(कोणतेही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)