सुखबीर सिंह बादल यांना धार्मिक शिक्षा

आपल्या सरकारच्या काळात वादग्रस्त राम रहीमला वाचवणे सुखबीर सिंह बादल यांच्यासह त्यांच्या सहकाऱयांना महागात पडले. सुवर्ण मंदिरातील शौचालय आणि भांडी घासा, असे आदेश शीख धर्मातील सर्वोच्च समिती असलेल्या अकाली तख्तने पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना दिले आहेत. 2015 मध्ये अकाली सरकारच्या काळात डेरा प्रमुख राम रहीमला माफ करण्यात महत्त्वाची भूमिका असल्याने सुखबीर यांना धार्मिक शिक्षा सुनावण्यात आली आहे. सुखबीर यांच्यासह त्यांच्या सरकारच्या काळात मंत्रिमंडळातील इतर सदस्यांनी धार्मिक गैरवर्तन केल्याप्रकरणी त्यांना शिक्षा ठोठावण्यात आली. एक महिन्यापूर्वीच सुखबीर यांना धार्मिक दोषी घोषित करण्यात आले होते.