भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओ या दोन खासगी कंपन्यांनी देशामध्ये सर्वात प्रथम 5जी नेटवर्क सुरू केले. त्यामुळे अनेक ग्राहक एअरटेल आणि जिओशी जोडले गेले. त्यामुळे जिओच्या ग्राहकांची एकूण संख्या गेल्या काही वर्षांमध्ये 47 कोटींहून अधिक झाली आहे. सुरुवातीला मोफत सीमकार्ड देऊन ग्राहकांना आपल्याकडे आकर्षीत करणाऱ्या जिओ कंपनीने मात्र आता ग्राहकांच्या खिशाला कात्री लावण्यास सुरुवात केली आहे. जिओने आपल्या 5जी इंटरनेट आणि रिचार्जच्या दरात जवळपास 20 ते 25 टक्क्यांनी दरवाढ केली आहे.
जिओने आपल्या ग्राहकांना धक्का दिसा असून जुलै महिन्यापासून जिओचे रिचार्च महाग होणार आहेत. जिओचा नवीन प्लॅन 3 जूलै 2024 पासून लागु होणार आहेत. यानुसार Preepaid आणि Postpaid प्लॅनच्या किंमती 50 रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत. म्हणजेच 399 रुपयांना मिळणारा रिचार्ज जुलै महिन्यापासून 449 रुपयांना मिळणार आहे.