रेखा गुप्ता यांनी घेतली दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी रेखा गुप्ता यांनी शपथ घेतली आहे. तब्बल 27 वर्षानंतर दिल्लीत भाजपची पुन्हा सत्ता आली आहे. या निवडणुकीत महिलांची भूमिका महत्त्वाची होती, म्हणून भाजपने दिल्लीचे मुख्यमंत्रीपद रेखा गुप्ता यांच्याकडे दिले असे सांगितले जात आहे.

1993 ते 1998 साली दिल्लीत भाजपचं सरकार होतं. 1998 साली काँग्रेसचं सरकार आलं आणि त्यानंतर थेट 2013 साली पहिल्यांदा आपचं सरकार आलं होतं. या निवडणुकीत सर्वाधिक जागा या भाजपच्या आल्या होत्या. पण आपला काँग्रेसने बाहेरून पाठिंबा दिल्यानंतर आपचं सरकार स्थापन झालं होतं. आता यंदा 27 वर्षानंतर भाजपला बहुमत मिळाले आहे. आणि रेखा गुप्ता या दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या आहेत.