
नवी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाला होता. भाजपने रेखा गुप्ता यांची मुख्यमंत्रीपदी निवड केली आहे. रेखा गुप्ता या विधानसभा नेतेपदी निवड होईल आणि उद्या रामलीला मैदानावर त्यांचा शपथविधी होईल.
नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी आपचा पराभव झाला आणि भाजपचा विजय झाला. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत प्रवेश वर्मा, विजेंद्र गुप्ता, जितेंद्र महाजन आणि रेखा गुप्ता यांची नावं होती. पण पक्षाने रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.
कोण आहेत रेखा गुप्ता
रेखा गुप्ता या शालीमार बाग विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. सध्या त्या दिल्ली भाजपच्या महासचिव आणि महिला विभागाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. 1974 साली हरयाणात त्यांचा जन्म झाला होता, त्यांचे वडिल स्टेट बँकेत अधिकारी होते. 1976 साली गुप्ता यांचें कुटुंब दिल्लीत स्थायिक झाले. रेखा गुप्ता यांनी दिल्लीतच आपले शिक्षण पूर्ण केले.
कॉलेजमध्ये असतानाच त्यांचा संबंध राष्ट्रीस स्वयंसेवक संघ आमि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी आला. 1995-96 साली त्यांनी विद्यापीठाच्य्या छात्रसंघाची निवडणूक लढवली आणि जिंकलीसुद्धा.
श्रीमती रेखा गुप्ता जी को दिल्ली भाजपा विधायक दल का नेता चुने जाने पर हार्दिक बधाई एवं अशेष शुभकामनाएँ।
हमें पूर्ण विश्वास है कि आपके नेतृत्व में प्रदेश उत्तरोत्तर प्रगति करेगा। pic.twitter.com/K8Mu5SyvdV
— BJP Delhi (@BJP4Delhi) February 19, 2025