संजय गांधी उद्यानातील पुनर्वसनाचा प्रश्न सोडवणार, सुनील प्रभू यांच्या पाठपुराव्याला यश

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 25 हजार झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडविणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना दिली.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 25 हजार झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी विधानसभेत आग्रहाने  मांडला होता. सुनील प्रभू यांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील झोपडपट्टीवासीयांना दिलासा देण्याची घोषणा केली.

मुंबईगोवा महामार्ग

शिवसेनेचे विधानसभेतील गटनेते भास्कर जाधव यांनी रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाची समस्या मांडली होती. त्याचीही  मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. मुंबई-गोवा महामार्ग या महामार्गाच्या कामातील अडचणी दूर करण्यात करण्यात आल्या आहेत. युद्धपातळीवर या प्रकल्पाचे काम सुरू असून हा महामार्ग पूर्ण होईल, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

पीक विमा गैरप्रकारांची चौकशी

पीक विम्यातील गैरप्रकाराची तक्रार सुरेश धस, सुनील प्रभू यांनी केली होती. यातील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी केली होती. त्यावर या योजनेबाबत सदस्यांनी काही गंभीर मुद्दे सभागृहात उपस्थित केले आहेत. त्यामुळे बीडसह राज्यातील अन्य जिह्यांत या योजनेबाबत काही गैरप्रकार घडल्याने यासंदर्भात सखोल चौकशी केली जाईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.