
अमरनाथ यात्रेसाठी येत्या 14 एप्रिलपासून नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे. अमरनाथ यात्रा जून ते ऑगस्ट असे पाच महिन्यांपर्यंत चालते. या वर्षी अमरनाथ यात्रा ही 3 जुलैपासून सुरू होणार असून 9 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. जम्मू-कश्मीर प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली आहे. 38 दिवस चालणाऱ्या या यात्रेसाठी पुढील महिन्यापासून नोंदणी सुरू होणार आहे. गेल्या वर्षी बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी पाच लाखांहून अधिक भाविक गेले होते. या वर्षी यात वाढ होण्याची शक्यता आहे.