रिगल क्रिकेट क्लबची आगेकूच

रिगल क्रिकेट क्लबने स्पोर्टिंग युनियन क्लबचा सहा गडी राखून पराभव करत पाचव्या अर्जुन मढवी स्मृती मर्यादित 40 षटकांच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत स्थान मिळवले. स्पोर्टिंग युनियन क्लबच्या 153 धावांचे लक्ष्य रिगल क्रिकेट क्लबने 26.4 षटकांत चार फलंदाजांच्या मोबदल्यात 154 धावा करत पार केले. अष्टपैलू कामगिरी करणारी रिगल क्रिकेट क्लबची सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली.

स्पोर्टिंग युनियन क्लबच्या फलंदाजांनी धावा कमी करूनही स्वैर चेंडूवर आणि दंड स्वरूपात मिळालेल्या धावांमुळे स्पोर्टिंग युनियन क्लबच्या खात्यात दीड शतकी धावसंख्या जमा झाली. रिगल क्रिकेट क्लबच्या गोलदाजांनी सुमारे 60 अवांतर धावा दिल्या. याशिवाय षटकांची गती कमी राखल्याने त्यांना 13 धावांचा दंड पत्करावा लागला.

संक्षिप्त धावफलक ः स्पोर्टिंग युनियन क्लब ः 39 षटकांत 7 बाद 153( मानसी चव्हाण 24, दीपाली शेलार नाबाद 14, चेतना बिष्ट 9/1, वैष्णवी अय्यंगार 21/1)विरुद्ध रिगल क्रिकेट क्लब ः 26.4 षटकांत 4 बाद 154 (चेतना बिष्ट 36, जेटसून ची ना. 35, हर्षल जाधव 27, आकांक्षा मिश्रा 32, मानसी चव्हाण 30/2, निधी सावंत 4/1).