इन्स्टावर रील लॉक फीचर येतेय

इन्स्टाग्राम आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर घेऊन येत असते. त्यामुळे इन्स्टाग्राम अधिक युजर फ्रेंडली होते. लवकरच इन्स्टाग्राम एक खास फीचर घेऊन येणार आहे. तशी हिंट इन्स्टाग्रामने आज पोस्ट शेअर करून दिली. नव्या फीचरच्या मदतीने युजर्स आपले रील एखाद्या पासवर्डच्या सहाय्याने लॉक करू शकतात. म्हणजे पासवर्ड टाकूनच रील ओपन करता येतील. इन्स्टाग्रामचे हे फीचर ब्रॅण्ड्स आणि कंपन्यांसाठी फायदेशीर असेल. युजर एंगेजमेंट वाढवणे, प्रोडक्ट लाँच, स्पेशल अनाऊंसमेंट, सिक्रेट कंटेटसाठी सस्पेन्स आणि एक्साटमेंट वाढवणे यासाठी हे फीचर चांगले आहे.