बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरोधात फास आवळण्यास आता तेथील मोहम्मद युनूस यांच्या हंगामी सरकारने सुरुवात केली आहे. पोलिसांच्या नॅशनल क्राइम ब्युरोने इंटरपोलच्या माध्यमातून शेख हसीना यांच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. हसीना यांच्यासह 12 लोकांच्या नावांचा यात नोटिशीत समावेश आहे. गेल्या वर्षी 5 ऑगस्टपासून शेख हसीना हिंदुस्थानात रहात आहेत. विद्यार्थ्यांच्या संतापाचा उद्रेक झाल्यानंतर शेख हसीना यांना बांगलादेश सोडावा लागला होता.