जगभरातील देशांना ‘रेड अलर्ट’, अमेरिकेवर दाटले मंदीचे काळे ढग!

जागतिक महासत्ता म्हणून मिरवणाऱ्या अमेरिकेवर पुन्हा एकदा मंदीचे काळे ढग दाटू लागले आहेत. अमेरिकेचा आयएसएम सर्व्हिसेस पीएमआय निर्देशांक गेल्या महिन्यात पाच अंकांनी घसरून 48.8 वर आला, जो 52.5 वर अपेक्षित होता. व्यवसाय क्रियाकलाप निर्देशांक 11.6 अंकांनी घसरून एप्रिल 2020 नंतरच्या नीचांकी पातळीवर आला आहे. गेल्या 2 महिन्यांत देशातील उत्पादन क्षेत्रात 19 वेळा घसरण झाली असून महामंदीनंतरचा हा सर्वात मोठा कालावधी आहे. यापूर्वी सेवा आणि उत्पादन निर्देशांक केवळ मंदीच्या काळातच घसरले. यावरून अमेरिकेची अर्थव्यवस्था झपाटय़ाने घसरत आहे. हे मंदीचे लक्षण असल्याचे दिसते. अमेरिकेवरील कर्जाचा भारही विक्रमी पातळीवर पोहोचला. एप्रिल 2024 च्या आकडेवारीनुसार फेडरल सरकारचे कर्ज 34.6 अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे, जे देशाच्या जीडीपीच्या 125 टक्के जास्त आहे.