स्टेट बँक ऑफ इंडियात (एसबीआय)स्पेशालिस्ट ऑफिसर पदासाठी बंपर भरती सुरू केली आहे. बँकेने 1040 पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. हिंदुस्थानातील बँकेच्या विविध शाखांमध्ये स्पेशालिस्ट पॅडर ऑफिसर्स (एसओ)ची भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 ऑगस्ट आहे. उमेदवार 8 ऑगस्टपर्यंत फी जमा करू शकतात. या भरतीसंदर्भात सविस्तर माहिती बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे.