केंद्र सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या ए. आय. एअरपोर्ट सर्व्हिसेसच्या सुरू असलेल्या भरतीमध्ये प्रशासनाकडून उमेदवारांच्या रांगा भरपावसात लावून कोणत्याही सुविधा दिल्या नसल्याने हजारो उमेदवारांचे हाल झाले. शिवाय व्यवस्थापनामध्येही मनमानी कारभार सुरू असून कामगारांच्या बढती, बदलीमध्ये अन्याय केला जात आहे. याची दखल स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाने घेतली असून व्यवस्थापनाच्या मुजोरीविरोधात धडक मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.
एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या ए. आय. एअरपोर्ट सर्क्हिसेसमध्ये 12 ते 16 जुलैदरम्यान किकिध पदासाठी भरती प्रक्रिया राबकली. भरतीसाठी देशभरातून आलेल्या उमेदकारांची कोणतीच व्यवस्था केली नाही. एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समितीने वेळोवेळी व्यवस्थापनाला पत्रव्यवहार करूनदेखील व्यवस्थापनाने भरपावसात उमेदवारांना उभे केल्यामुळे मुलांचे प्रचंड हाल झाले. शिवाय व्यवस्थापनाअंतर्गत जुन्या कामगारांचे प्रमोशन याबद्दल स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे सरचिटणीस प्रदीप मयेकर यांनी क्यकस्थापनाला पत्र देण्यासाठी उल्हास बिले, अजित चव्हाण, देविदास वेलिंग, सुनील आढाव, स्थानिक पदाधिकारी रामकृष्ण आंबेकर, प्रदीप वाघ यांना पाठवले, परंतु व्यवस्थापनातील अधिकाऱयांनी पत्र घेण्यास टाळाटाळ केली.
गोरगरीब उमेदवारांना नाहक भुर्दंड
16 जुलै रोजी हँडीमनच्या 1786 पदासाठी रात्रीपासून सुमारे 20 ते 30 हजार उमेदवारांची तुडुंब गर्दी होऊन क्यकस्थापनाला केवळ फॉर्म जमा करून घेण्याची नामुष्की ओढकली. क्यकस्थापनाच्या चुकीच्या नियोजनमुळे महाराष्ट्रासह विविध राज्यांतून आलेल्या गरीब बेरोजगार तरुणांना केवळ फॉर्म जमा करण्यासाठी मानसिक त्रास व हजारो रुपये भुर्दंड सहन कराका लागला.
लोकाधिकारचा लवकरच धडक मोर्चा
जुन्या कामगारांना न्याय मिळकून देण्यासाठी लककरच स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाकडून ए. आय. एअरपोर्ट सर्क्हिसेस लिमिटेडच्या कार्यालयाकर स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष शिवसेना नेते, सचिव-खासदार अनिल देसाई यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढणार असल्याचे महासंघाचे सरचिटणीस प्रदीप मयेकर व एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समितीचे सरचिटणीस प्रशांत साकंत, प्रवीण शिंदे यांनी सांगितले.