विमानतळ प्राधिकरणात 309 पदांसाठी भरती

एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भौतिकशास्त्र आणि गणितासह बीएससी पदवी किंवा अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय जास्तीत 27 वर्षे असायला हवेच. निवड झालेल्या उमेदवाराला प्रति महिना 40 हजार ते 1 लाख 40 हजारांपर्यंत पगार दिला जाईल. तसेच इतर भत्तेसुद्धा मिळतील. अर्ज भरण्यासंबंधी सविस्तर माहिती aai.aero या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे.