नोकरी! बीएसएफमध्ये 1760 पदांची भरती सुरू

सीमा सुरक्षा दल अर्थात बीएसएफमध्ये हेड कॉन्स्टेबल आणि एएसआय स्टेनोग्राफरच्या पदांची भरती केली जात आहे. आधी ही भरती 1526 होती, परंतु ती वाढवून 1760 करण्यात आली आहे. यामध्ये सीआरपीएफ 279, बीएसएफ 501, आयटीबीपी 219, एसएसबी 84, सीआयएसएफ 642, एआर 35 पदांची भरती केली जाणार आहे. सहाय्यक उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल पदासाठी उमेदवार बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

उमेदवारांचे वय किमान 18 ते 25 वर्षे असायला हवे. अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावे लागेल. आरक्षणासाठी पात्र महिला उमेदवार, अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि माजी सैनिकांना शुल्क भरण्यापासून सूट आहे.