
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) ने कॉन्स्टेबल ट्रेड्समन पदांसाठी आजपासून भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीमध्ये 945 पदे ही पुरुषांसाठी राखीव आहेत, तर 103 पदे ही महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. ही भरती महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरयाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू-कश्मीर, लडाख, पंजाब, दिल्ली, उत्तराखंड, गोवा, गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक, तामीळनाडू, तेलंगणा, पुद्दुचेरीसह अन्य राज्यांत केली जाणार आहे. भरतीसंबंधी सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइट cisfrectt.cisf.gov.in वर देण्यात आली आहे.