
आंध्र प्रदेश, तामीळनाडूनंतर आता कर्नाटकनेही भाषायुद्धात उडी घेतली आहे. कन्नड भाषा अनिवार्य न केल्याने कर्नाटक सरकारने नोकरभरतीची जाहिरात मागे घेतली. बंगळुरू मेट्रो रेल महामंडळाने काढलेली एक वादग्रस्त जाहिरात मागे घेण्यात आली. बंगळुरूच्या नम्मा मेट्रोमध्ये 50 लोको ऑपरेटरची जाहिरात देण्यात आली होती. उमेदवारांना कन्नड भाषेचे ज्ञान आवश्यक नसल्याचे त्यात म्हटले होते. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री यांनी ही जाहीरात रद्द करण्यात आल्याची माहिती एक्सवरून दिली.
पुद्दुचेरीत तमीळ पाट्यांची सक्ती
दुकानांवर यापुढे तमीळ भाषेतच नावांच्या पाट्या दिसल्या पाहिजेत, असे आदेश देण्यात आले असून याबाबत सर्क्युलरही काढण्यात आले आहे. अशी माहिती पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री एन. रंगासामी यांनी विधानसभेत दिली.