
हिंदुस्थानातील उत्पादनांवर 2 एप्रिलपासून रेसिप्रोकल टेरिफ म्हणजेच जशास तसे अतिरिक्त शुल्क आकारण्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. या टेरीफच्या टेन्शनमुळे आज शेअर बाजारात अक्षरशः भूपंप झाला. शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल 1 हजार 390 अंकांनी म्हणजेच 1.80 टक्क्यांनी कोसळला. त्यामुळे गुंतवणूकदारांचे तब्बल 3.49 लाख कोटी बुडाले. अमेरिकेचे टेरिफ लागू होण्यापूर्वीच शेअर बाजारात मोठी घसरण झाली. बाजार उघडताच गुंतवणूकदारांनी मोठय़ा प्रमाणावर शेअर्सच्या विक्रीला सुरुवात केली. त्यामुळे सेन्सेक्स 1 हजार 390 अंकांनी घसरून 76,024 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 353 अंकांनी घसरून 23,965 अंकांवर बंद झाला.