घरातील पार्टीसाठी बनवा हे झणझणीत व्हेज स्टार्टर, शाकाहारी पाहुणे होतील खूष

घरात जर पार्टी असेल तर व्हेज स्टार्टर काय बनवायचा हा प्रश्न अनेकांना असतो. त्यामुळे बऱ्याचदा फ्रेंज फ्राईज, नगेट्स, व्हेज टिक्की केल्या जातात. आज आम्ही तुम्हाला एक जबरदस्त झणझणीत असं व्हेज स्टार्टर सांगणार आहोत. हे स्टार्टर करायलाही सोपं आहे आणि ते खाल्ल्यानंतर तुमचे पाहुणे देखील खूष होतील.

साहित्य – पनीर, हिरव्या मिरच्या, लसूण, जीरं, कोथिंबीर, तेल, मिठ, शेंगदाणे हे सगळे पदार

कृती – हिरव्या मिरच्या, लसूण, जीरं, कोथिंबीर, मिठ, शेंगदाणे हे सगळे पदार्थ खलबत्त्यात जाडसर कुटून घ्यावे, मिक्सरला लावू नये. त्यानंतर पनीरचे चौकोनी तुकडे करून त्याच्या सर्व बाजूंना हे पनीर लावून घ्यावे. त्यानंतर तव्यात हलके तेल टाकून सर्व बाजूने पनीर खरपूस भाजून घ्या.