जम्मू आणि कश्मीर बस हल्ल्यामागे लश्कर-ए-तोयबा? NIA ने व्यक्त केला संशय

J&K-fire-on-tourist-bus

गेल्या महिन्यात जम्मू-कश्मीरच्या रियासी जिल्ह्यात यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर झालेल्या हल्ल्यात लष्कर-ए-तोयबा (LeT) या दहशतवादी संघटनेचा हात असण्याची शक्यता राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) व्यक्त केली आहे. लष्कर-ए-तोयबा (LeT) या दहशतवादी संघटनेच्या पाकिस्तानस्थित हस्तकांची यात मोठी भूमिका असू शकते असा संशय NIA ला आहे.

हकम खान उर्फ ​​हकीन दिन याला गेल्या महिन्यात दहशतवाद्यांना आश्रय, अन्न आणि रसद पुरवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्याची चौकशी NIA कडून सुरू आहे.

9 जून रोजी शिव खोरी मंदिरातून कटरा येथील वैष्णोदेवी मंदिराकडे जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात नऊ जण ठार आणि 41 जखमी झाले होते. गोळीबारामुळे वाहन रस्त्यावरून उलटून दरीत कोसळले.

दहशतवादविरोधी यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, या हल्ल्यात किमान तीन दहशतवाद्यांचा सहभाग असावा.