
प्रसिद्ध बॉलिवूड कोरिओग्राफर टेरेन्स लुईस यांनी रिअॅलिटी शोबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. तो म्हणाला की, रिअॅलिटी शोमध्ये बहुतांशी स्क्रिप्टचा वापर केला जातो. अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत, टेरेन्सने या स्पर्धेमागील सत्य उघड केले आहे. टेलिव्हिजन प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी कशापद्धतीने ड्रामा आखला जातो हे सर्व आधीच नियोजित केलेले असते.
रिअॅलिटी शोमध्ये अनेकदा आपल्याला दिसणारी दृश्य किंवा नाट्य हे सर्व घडवून आणलेलं असतं. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी रिअॅलिटी शोमध्ये सतत बदल घडवणं हे क्रमप्राप्त असतं. हे बदल प्रामुख्याने भावनिक आधारावर किंवा मनोरंजन आधारावर घडवून आणले जातात. भावनिक विषयाला हात घातला की, प्रेक्षक शक्यतो रिमोटला हात लावत नाहीत. त्यामुळेच गरीबी हा विषय रिअॅलिटी शोच्या माध्यमातून खूप वाहवा मिळवतो.
एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये, टेरेन्स म्हणाला, “लोकांना वाटतं की, आम्ही सहज उठून डान्स शोमध्ये नाचतो. पण असं नसतं. आम्हाला नाचायला लावलं जातं. केवळ इतकंच नाही तर, पाहुण्यांशी आणि स्पर्धकांशी संवाद काय साधायचा असतो हे देखील नियोजित असते. परंतु परीक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रिया या मात्र खऱ्या असतात.”
टेरेन्सने खुलासा केला की, त्याला स्टेजवर एक नाट्यमय क्षण तयार करण्यास सांगितले होते. दीपिका पादुकोणसोबतच्या त्याच्या डान्स व्हिडिओची आठवण करून देताना तो म्हणाला की, त्या क्षणी त्याला काहीतरी नवीन करावे लागले होते आणि मुख्य म्हणजे दीपिकाला हे असे घडणार आहे याची जाणीवही नव्हती. त्यावेळी त्याने तिथे अगदी स्पष्टपणे नकार दिला होता. तो म्हणाला, “मी हे कधीच करणार नाही. माझ्या आठ वर्षांच्या परीक्षकाच्या कारकिर्दीत, मी कधीही कोणत्याही स्पर्धकाला किंवा सेलिब्रिटीला स्टेजवर अशा प्रकारे बोलावले नाही.