जगभरातील बातम्या वाचा झटपट

लिसा नंदी ब्रिटनच्या सांस्कृतिक मंत्रीपदी

हिंदुस्थानी वंशाच्या लिसा नंदी यांची ब्रिटनच्या सांस्कृतिक मंत्री पदी निवड झाली आहे. प्रधानमंत्री केअर स्टॉर्मर यांनी लिसा यांची मंत्री पदी निवड केली. त्यांच्याकडे सांस्कृतिक खात्यासह मीडिया आणि क्रीडा विभागाचा भारही आहे. निवडणुकीत लेबर पार्टीच्या विजयानंतर स्टॉर्मर यांनी लगेचच मंत्रिमंडळाची घोषणा केली. लिसा या 2020 मधील लेबर पार्टीच्या अध्यक्ष पदाच्या 3 दावेदारांपैकी एक होत्या.

जो बायडनच्या उमेदवारीला विरोध

बायडन यांनी अमेरिकेच्या राष्ट्रपती निवडणुकीतून माघार घ्यावी, असे मत डेमोव्रेटिक पक्षाच्या 5 सदस्यांनी मांडले आहे. बायडन यांच्या उमेदवारीला अनेकांनी विरोध दर्शवला आहे. बायडन यांनी स्वतःच आपली कामगिरी खराब असल्याचे म्हटले होते तसेच त्यांचे अॅप्रोवेल रेटिंग कमी झाले होते. बायडन यांना आरोग्याच्या तक्रारी असून स्थानीक मीडियानुसार बायडन यांना या निवडणुकीतून माघार घ्यायला हवी.

ब्रिटिश संरक्षण मंत्री युव्रेनच्या दौऱयावर

ब्रिटनचे नवे संरक्षण मंत्री जॉन हीली आपल्या पहिल्या परदेश दौऱयात युव्रेनला पोहोचले आहेत. हिली यांनी युव्रेनच्या ओडेसा शहराला भेट दिली. यावेळी त्यांनी युव्रेनला युद्ध सहाय्य म्हणून तोफगोळे, मिसाईल देण्याचे आश्वासन दिले. पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी नुकतीच हिली यांची संरक्षण मंत्री म्हणून नेमणूक केली आहे. यानंतर ते उव्रेनला पोहोचले. युव्रेनचे राष्ट्रपति वोलोदिमीर जेलेंस्की आणि संरक्षण मंत्री रुस्तम उमेरोव यांची भेट घेतली.