विराट कोहलीला न विचारताच त्याची बॅग उघडली, परफ्यूमही वापरला; चिकाराच्या वर्तनानं RCB चे खेळाडू हैराण

जगातील सर्वात मोठी लीग असा बिरूद मिरवणारी इंडियन प्रीमियर लीग हळूहळू रंगात येऊ लागली आहे. या लीगचा पहिलाच सामना गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात रंगला होता. कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर झालेला हा सामना जिंकत बंगळुरूने विजयाने श्रीगणेशा केला. या लढतीत विराट कोहली याने दमदार अर्धशतकही ठोकले.

विराट बंगळुरूच्या संघातील सर्वात वरिष्ठ खेळाडू आहे. गेल्या 18 हंगामापासून तो या संघाकडून खेळत आहे. संघातील तरुण खेळाडूंसोबतही तो जुळवून घेत असून त्यांची कंपनीही एन्जॉय करताना दिसत आहे. मात्र, नुकताच एक असा प्रसंग घडला ज्यामुळे बंगळुरूच्या संघातील खेळाडूही हैराण झाले आहेत. याचा खुलासा वेगवान गोलंदाज यश दयाल याने केला आहे.

कोलकाताविरुद्धचा सामना संपल्यानंतर आम्ही ड्रेसिंग रुममध्ये बसलो होतो. त्याचवेळी स्वस्तिक चिकाराने विराटला न विचारताच त्याची बॅग उघडली, परफ्यूम बाहेर काढला आणि स्वत:वर फवारलाही. हा प्रकार पाहून सर्वच हैराण झाले. विशेष म्हणजे विराटही त्यावेळी तिथे बसलेला होता, त्यानेही काही म्हटले नाही, असे यश दयाल म्हणाला.

हे वाचा – पायाला प्लास्टर, हताश नजर; RR च्या सलग दुसऱ्या पराभवानंतर द्रविडचा व्हिलचेअरवरील फोटो व्हायरल, नेटकरी हळहळले

बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदार हा देखील चिकाराचे वर्तन पाहून हैराण झाला होता. मी विचार करत होतो की हा मुलगा काय करत आहे? विराट भाई अगदी समोर होता, पण स्वस्तिकने कोणताही संकोच न बाळगता त्याचा परफ्यूम वापरला, असे पाटीदार म्हणाला.

IPL 2025 – ते तुझं काम होतं! ‘मुलतानचा सुलतान’ वीरेंद्र सेहवागची LSG चा कर्णधार ऋषभ पंतवर बोचरी टीका

या घटनेबाबत स्वस्तिक चिकाराला विचारले असता तो म्हणाला की, विराट माझ्या मोठ्या भावासारखा आहे. मी फक्त तपासत होतो की तो खराब झालेल्या परफ्यूम तर वापरत नाही ना. मी आधी वापरून पाहिला आणि नंतर त्याला चांगला आहे असे सांगितले. दरम्यान, 19 वर्षीय स्वस्तिक चिकाराला बंगळुरूने 30 लाखांच्या बेस प्राईजला खरेदी केले आहे.