500 रुपयांच्या बनावट नोटांसंबंधी भारतीय रिझर्व्ह बँकेने गाईडलाईन जारी केली. 19 मे 2023ला 2 हजाराच्या नोटा बंद झाल्यानंतर मार्केटमध्ये सर्वात जास्त 500 रुपयांच्या नोटा चलनात आल्या आहेत. त्यामुळे अनेक जण याचा गैरफायदा घेत मार्केटमध्ये बनावट नोटा चलनात आणत आहेत. त्यामुळे 500 रुपयाच्या नोटा कोणी तुम्हाला देत असतील तर त्या तपासून घ्या, असे निर्देश आरबीआयने दिले आहेत.
नोटा कशा तपासाव्यात यासाठी आरबीआयने एक गाईडलाईन जारी केली आहे. लोकांना बनावट आणि खऱ्या नोटांची ओळख असायला हवी. लोकांची फसवणूक होऊ नये, यासाठी आरबीआयने ही गाईडलाईन जारी केली आहे. बनावट नोटा मिळताच त्वरीत बँकेशी संपर्क साधून याची माहिती देण्यात यावी, असेही आरबीआयने म्हटले आहे.
500 रुपयांची खरी नोट ओळखण्याची सोपी पद्धत ः नोटेवर लिहिलेला 500 हा अंक पारदर्शी असतो. 500 रुपयांच्या नोटेवर लेटेंट इमेज असेल. नोटेवर देवनागरी लिपीत पाचशे रुपये लिहिलेले असेल. नोटेला तिरपे केल्यानंतर सिक्योरिटी थ्रेड रंग निळ्या रंगात बदलतो.
एटीएममधून बनावट नोटा मिळण्याची शक्यता
एटीएममधून बनावट नोटा मिळण्याची शक्यता आहे. काही लोक बँकेच्या एटीएमपर्यंत बनावट नोटा पोहोचवण्याचे काम करत आहेत. एटीएममधून बनावट नोटा हातात पडल्यानंतर बँकेचे अधिकारीसुद्धा या नोटांसंबंधी हात झटकत असतात. त्यामुळे नागरिकांनी नोटांसंबंधी काळजी घेणे आवश्यक आहे. आरबीआयच्या गाईडलाईन्सनुसार बनावट नोटा जवळच्या बँक शाखेत जाऊन बदलू शकता.