स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि ऑल इंडिया रिझर्व्ह बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष, ज्येष्ठ शिवसैनिक अजित सुभेदार यांचे कोकिळाबेन रुग्णालयात निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. गेली 50 वर्षे बँक कामगार क्षेत्रात ते कार्यरत होते. बँक कर्मचाऱ्याची पगारवाढ, त्यांचे विविध प्रश्न यासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट घेतले. सुभेदार यांच्या पार्थिवावर घाटकोपर येथील राजावाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी आमदार विलास पोतनीस, शिवसेना उपनेते अमोल कीर्तिकर आणि बँकिंग क्षेत्रातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुनीता सुभेदार आहेत.