
ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अमेरिका दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्योगपती गौतम अदानी यांच्याबद्दल तेथील पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. मात्र याचं उत्तर देताना मोदींनी मूळ प्रश्नाला बगल देत, काहीही संबंध नसताना ‘वसुधैव कुटुंबकम्’ (जग हे कुटुंब आहे) बद्दल बोलले. तसेच अदानी यांचा प्रश्न वैयक्तिक असल्याचं म्हणत तो सोडून दिला आणि येथेच मोदी फसले, असं रवीश कुमार आपल्या व्हिडीओत म्हणाले आहेत.
ट्रम्प यांच्यासमोरच अदानींबद्दल प्रश्न, पंतप्रधानांची अमेरिकेत उडाली भंबेरी
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी व्हाईट हाऊस येथील ओव्हल ऑफिसमध्ये अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यानंतर दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी गौतमी अदानी यांच्यावर न्यूयॉर्कच्या न्यायालयाने ठेवलेल्या लाचलुचपतीच्या ठपक्याबाबत तेथील पत्रकारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारला. मात्र या प्रश्नाचं थेट उत्तर न देता मोदी म्हणाले की, हिंदुस्थान हा लोकशाही देश आहे. आमची संस्कृती आणि तत्त्वज्ञान हे वसुधैव कुटुंबकम विचारसरणी मानणारे आहे. मी प्रत्येक हिंदुस्थानी आपला आहे, असे मानतो. तसेच जेव्हा दोन जागतिक नेते भेटत असतात तेव्हा अशा वैयक्तिक विषयावर चर्चा होत नसते, असं ते म्हणाले आहेत. यावरच रवीश कुमार यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
अमेरिका दौऱ्यादरम्यान मोदींच्या समोर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होत की, बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजेत. बॅलेट पेपरवर वापरल्याने निवडणूक निपक्ष होते, ईव्हीएम समर्थकांना ही गोष्ट ठीक वाटणार नाही, असंही रवीश कुमार आपल्या व्हिडीओत म्हणताना दिसत आहेत. मात्र डोनाल्ड ट्रम्प असं म्हणाले होते का, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.