
राजकारणात काहीही होऊ शकतं. भाजपने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जेलच्या दारात नेऊन बसवलं होतं. आपल्याला वाटत होतं का? अजित पवार आणि भाजप एकत्रित येतील. भाजपमध्ये सगळेच लोक वाईट आहेत, असं नाही. लोकशाहीमध्ये स्पर्धा असते, असे सांगत मिंधे गटात सामील झालेले माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर निशाणा साधला.
धंगेकर म्हणाले, ‘भाजपकडे अजित पवार यांच्याविरोधात ट्रकभर कागदपत्रे आहेत, असेही सांगितले जात होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अजित पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर अजित पवार यांना सोबत घेऊन त्यांना अर्थ खातंही देण्यात आले. त्यामुळे राजकारणात काहीही घडू शकते. लोकशाहीमध्ये स्पर्धा असते. एकमेकांच्या डोक्यावर, पाय ठेवल्याशिवाय कोणी मोठं होत नाही. राजकारणात तर एकमेकांच्या डोक्यावर पाय ठेवल्याशिवाय मोठा होता येत नाही,’ असेही ते म्हणाले.