रवींद्र धंगेकर यांचा चौथ्यांदा पक्षबदल

सुमारे चारवेळा नगरसेवक आणि दीड वर्ष आमदार राहिलेले माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी चौथ्यांदा पक्ष बदलला. त्यांनी शिवसेनेतून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. त्यानंतर धंगेकर यांनी मनसेमध्ये प्रवेश केला. मनसेनंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. महाविकास आघाडीने कसब्याच्या पोटनिवडणुकीत धंगेकर यांना संधी दिली. त्यावेळी महाविकास आघाडीने भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत धंगेकर यांना निवडून आणले. काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे धंगेरकर नाराज असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. अखेर सोमवारी धंगेकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत मिंधे गटात प्रवेश केला.