माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या बंगल्यावर 9 कोटी रुपयांच्या वसुलीसाठी अपहरण करून तरुणावर अत्याचार केले जात असल्याचा खळबळजनक आरोप आज काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार नाना पटोले यांनी सभागृहात केला.
नाना पटोले यांनी आज विधानसभेत मराठवाडय़ातील परभणी आणि बीड येथील घटनांकडे सरकारचे लक्ष वेधले. यावेळी रवींद्र चव्हाण यांच्यावर थेट आरोप पटोले यांनी केला. चव्हाण यांच्या बंगल्यावर वैभव नावाच्या मुलाला किडनॅप करून ठेवले आहे. 9 कोटी रुपयांसाठी त्याला किडनॅप केले असून त्याच्याकडून साडे चार कोटी रुपये वसूल केले आहेत. उर्वरीत साडे चार कोटी रुपयांच्या वसुलीसाठी त्याच्यावर अत्याचार केले जात आहेत. ही कसली वसुली आहे? एवढे पैसे आले कुठून, असा प्रश्नही नाना पटोले यांनी विचारला.