हिंदुस्थानी संघावर सर्वांनाच अभिमान, पराभवानंतरही शास्त्रींकडून संघाची पाठराखण

न्यूझीलंडकडून मिळालेला व्हाईटवॉश पुसून काढण्यासाठी हिंदुस्थानी संघाला बॉगाक मालिकेतील पहिल्या दोन कसोटींत जोरदार सुरुवात करण्याची गरज आहे. न्यूझीलंडविरुद्ध हिंदुस्थानी संघ अतिआत्मविश्वासाने खेळला आणि त्याची किंमत त्यांना चांगलीच भोगावी लागलीय. या निकालानंतरही हिंदुस्थानचा असा संघ आहे, ज्याचा आम्हा सर्वांना अभिमान असल्याचे हिंदुस्थानी संघाचे माजी कर्णधार आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सांगत त्यांची पाठराखण केली आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवाने निश्चित संघाचे मनोधैर्य खचलेय, पण संघाला यातून लवकरच बाहेर पडावे लागले. बॉगाक मालिकेत जोरदार कामगिरी करायची असेल तर प्रारंभीच्या दोन्ही कसोटींत दमदार खेळ दाखवावाच लागेल. हेच कसोटी सामने निर्णायक असतील. मालिका सुरू होण्यापूर्वी आपल्या खेळाडूंनी मानसिकरीत्या कणखर व्हायला हवे. संघाच्या प्रशिक्षकांनी संघाला यासाठी तयार करायला हवे. खेळाडूंची मानसिक स्थिती चांगली असेल तर मालिकेत दणदणीत प्रारंभ देणे सोयीस्कर जाईल. हिंदुस्थानने ऑस्ट्ल्रियात मागील दोन्ही मालिकांमध्ये अभूतपूर्व यश संपादलेय. गेल्या दोन्ही मालिकांमध्ये रवी शास्त्राr हेच संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. त्या यशापासून सर्वांनी प्रेरणा घ्यायला हवी. हे यश संघाचे मनोधैर्य उंचवू शकते आणि संघाला नकारात्मक गोष्टींपासून दूर ठेवू शकते. त्यामुळे केवळ सकारात्मक गोष्टींचा विचार करा आणि आता जे घडलेय ते विसरून जा. गेल्या दौऱयात जे यश मिळवलेय ते आठवा, असा सल्लाही त्यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंना दिला आहे.