देशाची व्यवस्था मागास आणि दलितांविरोधात, संविधानदिनी राहुल गांधी यांचा घणाघात

सरकार सर्वच क्षेत्र खासगीकरण करत आहे अशी टीका लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि खासदार राहुल गांधी यांनी केली आहे. तसेच देशाची संपूर्ण व्यवस्था ही दलित मागासवर्गीय आणि आदिवासींविरोधात आहे असेही राहुल गांधी म्हणाले.

दिल्लीत काँग्रेसकडून संविधान रक्षक अभियान राबवण्यात आले. या सभेत राहुल गांधी म्हणाले की तुमच्या समोर एक भिंत उभी आहे. ही भिंत नरेंद्र मोदी आणि संघ आणखी मजबूत करत आहे. या भिंतीत ते लोक सिमेंट घालत आहेत. सर्व ठिकाणी खासगीकरण सुरू आहे. पूर्वी सरकारी शाळा, सरकारी रुग्णालयं होती. आता दलित, आदिवासी आणि शेतकऱ्यांना उपचार हवा असेल तर त्यांच्या खिशातून लाखो रुपये खर्च होतात.

तसेच हिंदुस्थानमधला आदिवासी, दलित आणि मागासवर्गीय तरुण इंजिनीअर, डॉक्टर, वकील आणि आयएएस होण्याची स्वप्न बघतोय. पण सत्य परिस्थिती वेगळी आहे. देशाची संपूर्ण व्यवस्था मागास वर्गीय, दलित आणि आदिवासींविरोधात आहे. जर असं नसतंत तर देशातल्या 200 मोठ्या कंपन्यांचे मालक या वर्गातले असते असेही राहुल गांधी म्हणाले.