मानधन वाढवून मागितले म्हणून मालिकेतून काढून टाकले, रात्रीस खेळ चाले’मालिकेतील अभिनेत्रीचा धक्कादायक दावा

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेबरोबरच त्यातील कलाकारही तितकेच चर्चेत आले. प्रत्येकाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले होते. त्यातलेल एक पात्र संजीवनी पाटील म्हणजेच वच्छी.या मालिकेतील त्यांच्या अभिनयामुळे त्यांना वेगळी ओळख मिळाली. विशेष म्हणजे वच्छीचा लग्नातील मिरवणुकीतूल अतरंगी डान्स प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहे. त्यांनी नुकत्याच एका मुलाखतीत ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेत मानधन वाढवून मागितले म्हणून काढून टाकल्याचा धक्कादायक दावा केला आहे.

संजीवनी पाटील यांनी नुकतीच एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी कलाकारांना मिळणाऱ्या मानधनाबाबत भाष्य केले, त्या म्हणाल्या, आता मी काही निकष ठरवले असून दोन-तीन हजारात काम करणार नाही. वच्छीची भूमिका ही मरणारी होती का? मरण खरंच होते का त्या भूमिकेला? असे प्रश्न विचारत ती भूमिका खरंच खूप मोठी झाली असती. मात्र वच्छीने पर-डे मानधन वाढवायला सांगितले होते.त्यामुळे मालिकेत थेट भूमिकेलाच मारुन टाकले.

संजीवनी पाटील पुढे म्हणाल्या, मालिकेंमुळे प्रसिद्धी मिळतेच पण पैशांचे काय? घर आम्हालाही चालवायचे असते. कायम हे बजेट आमचं नाही असे बोलून डावलले जाते मग,आमचे बजेट असे केव्हापासून लोकं बोलणार? 2012 साली मी दोन ते तीन हजारात काम केले आणि आताही मी तेवढ्याच पैशांमध्ये काम करावे अशी इच्छा असेल तर मी घरी बसणे पसंत करेन अशी रोखठोक भूमिकाच मांडली. 2024 मध्येही मालिकांच्या ऑफर आल्या होत्या. पण मानधनाचे नीट जुळले नाही. साडेतीन हजारांच्या पुढे जात नव्हते. मी दरदिवसाला दहा हजाराची अपेक्षा करत नाही मात्र योग्य मानधनाची अपेक्षा नक्कीच करु शकते.

पुढे म्हणाल्या, मोठ्या कलाकारांना तुम्ही पर-डे चांगले मानधन देता. मग, माझ्यासारख्या मातीतल्या कलाकारांना का डावलले जाते? पण, आता मी त्या गोष्टीचा विचार करत नाही. विचार करून काम निवडते आणि येत्या काळात मला भरपूर काम करायचं आहे असे संजीवनी यांनी व्यक्त केले.