
रत्नागिरी तालुक्यातील वारे समुद्रकिनाऱ्यावर वाळूमाफियांची नजर पडली आहे.वारे समुद्र किनारी दिवसाढवळ्या वाळू उपसा सुरू आहे. वाळू वाहतूकीसाठी चक्क बैलगाडीचा वापर केला जात आहे. काही दिवसांपूर्वीच संगमेश्वर तालुक्यातील करजुवे येथील वाळूमाफियांचा भांडाफोड दैनिक सामनाने केल्यानंतर आता रत्नागिरी तालुक्यातील वाळूमाफियांचे प्रकरण पुढे आले आहे. वारे येथील समुद्रकिनाऱ्यावर दिवसाढवळ्या वाळू उपसा सुरू आहे. विशेष म्हणजे वाळू वाहतुकीसाठी बैलगाडीचा वापर केला जात आहे. वाळूमाफिया सुमद्रकिनारे गिळंकृत करत आहे. किनारपट्टीवरचे वाळू उत्खनन वेळीच न रोखल्यास भविष्यात धोका निर्माण होण्याची भीती पर्यावरणप्रेमीनी व्यक्त केला आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष
वारे किनारपट्टीवर दिवसाढवळ्या वाळू उत्खनन सुरू असताना प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष करत आहे.प्रशासनाच्या कारवाईची कोणतीही भीती वाळूमाफियांना राहिलेली नाही. त्यामुळे दिवसाढवळ्या वारे किनारपट्टीवर वाळू उत्खनन सुरू आहे. बैलगाडीतून होणारी वाळूची वाहतूक प्रशासनाला कधी दिसणार असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.