रत्नागिरी दक्षिणसाठी दत्ता कदम यांची प्रभारी जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने रत्नागिरी दक्षिण जिल्ह्याकरिता दत्ता कदम यांनी प्रभारी जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात देण्यात आली आहे.

तत्पूर्वी रत्नागिरी जिल्हा संहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विकास चाळके, चिपळूण-संगमेश्वर विधानसभा प्रमुख रोहन बने यांची पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.