
सोशल मीडियावर कोणत्याही धर्माबद्दल अफवा पसरवल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा रत्नागिरी पोलीस दलाने दिला आहे.
राजापूर तालुक्यात सोशल मीडियावर घडलेल्या काही घटनांच्या, तसेच वर्तमान पत्रांमध्ये प्रसारित झालेल्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर सोशल मिडियावर सायबर पोलीस ठाणे, रत्नागिरी मार्फत 24×7 पाहारा ठेवण्यात येत आहे. सोशल मिडियाद्वारे कोणत्याही धर्माबद्दल आक्षेपार्ह चित्र, पोस्ट, अफवा, चुकीचे संदेश अगर आक्षेपार्ह संदेश व व्हिडीओ प्रसारित केल्यास रत्नागिरी पोलीस दलाकडून कडक कारवाई करण्यात येणार. कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये अथवा बळी पडू नये. सोशल मिडियावर कोणत्याही धर्माबद्दल अफवा पसरवल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल याची दक्षता घ्यावी. फेसबुक,एक्स.इंस्टाग्राम व्हॉटसॲप आणि युट्युब च्या माध्यमातून कोणत्याही धर्माबद्दल आक्षेपार्ह चित्र, पोस्ट, अफवा, चुकीचे संदेश किंवा आक्षेपार्ह संदेश अथवा व्हिडीओ प्रसारित करण्यात येऊ नयेत.
सोशल मिडियावर प्रसारित करण्यात येणाऱ्या पोस्ट व वृत्तपत्रांमध्ये प्रसारित केल्या जाणाऱ्या बातम्या या प्रसारित करण्यापूर्वी संबंधित विभागाकडून खात्री करुनच प्रसारित करण्यात याव्यात. असे
रत्नागिरी जिल्ह्यामधील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.