
सेल्फी काढताना तोल जाऊन समुद्रात पडल्याने एका पर्यटक तरुणाचा बडुन मृत्यू झाला. इरफान झाकीर हुसेन जामदार असे मयत तरुणाचे नाव आहे. रत्नागिरीतील भंडारपुळे येथील समुद्रकिनाऱ्यावर गुरुवारी ही घटना घडली. स्थानिकांनी तात्काळ धाव घेत त्याला पाण्यातून बाहेर काढले.
हातकणंगले येथील रहिवासी असलेला इरफान रत्नागिरीतील भंडारपुळे येथील समुद्रकिनाऱ्यावर मित्रांसोबत पर्यटनासाठी आला होता. यावेळी समुद्रातील खडकावर उभा राहून तो सेल्फी घेत होता. मात्र त्याचा तोल गेला आणि तो समुद्रात पडला. यादरम्यान लाटेसोबत तो समुद्रात ओढला गेला.
स्थानिकांनी तात्काळ समुद्रात उड्या घेत इरफानला बाहेर काढले आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.