
रत्नागिरी शहरानजीकच्या भाट्ये पुलावर झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. महेश अनंत पिलणकर (47, रा.टाकळेवाडी फणसोप, रत्नागिरी) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
महेश पिलणकर हे फिनोलेक्स कंपनीत कामाला होते. रविवारी सायंकाळी ते रत्नागिरीत येत असताना भाट्ये पुलावरील चेकपोस्ट नजीक अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की महेश हे रस्त्यावर फेकले गेले. यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.