मालगुंड समुद्रकिनारी आढळला भला मोठा व्हेल मासा मृतावस्थेत

मालगुंड गायवाडी समुद्रकिनारी आज सकाळी एक भलामोठा व्हेल मासा मृतावस्थेत सापडला. समुद्रातील लाटेबरोबर हा मासा किनाऱ्यावर आला. ग्रामस्थांनी किनाऱ्यावर मृतावस्थेतील मासा पाहिल्यानंतर वन विभाग आणि पोलिसांना कळवले. वन विभाग आणि पोलिसांच्या पथकाने ग्रामस्थांच्या मदतीने हा मृतावस्थेतील मासा किनाऱ्यावरून बाहेर काढला.