
उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. दौऱ्यादरम्यान अजित पवार यांनी संगमेश्वर येथील सरदेसाई वाड्याला भेट दिली. यावेळी मधमाशांनी अजित पवार यांच्या ताफ्यातील पोलीस आणि अधिकाऱ्यांवर हल्ला केला. मधमाशांच्या हल्ल्यात काही पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झाले आहेत.
मधमाशांनी हल्ला करताच सर्वांची पळता भुई थोडी झाली. स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रत्येक जण सैरावैरा धावू लागला. दरम्यान अजित पवार यांना तात्काळ सुरक्षित गाडीत बसवल्यामुळे ते या हल्ल्यातून वाचले. संगमेश्वर येथील सरदेसाई वाड्याची पाहणी करत असताना मधमाशांनी अचानक हल्ला केला. यानंतर गाडीत बसण्यासाठी सर्वांची धावपळ झाली.