रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरातील अनधिकृत बांधकामावर आज मत्स्यववसाय विभागाने बुलढोझर फिरवला. आज पहाटे 5 वाजता पोलीस बंदोबस्तात या कारवाईला सुरूवात झाली.
मिरकरवाडा बंदरात 319 अनधिकृत बांधकामे होती. 15 दिवसांपूर्वीच या सर्व अनधिकृत बांधकामांना नोटीस बजावण्यात आली होती. नोटीसची मुदत 23 जानेवारी रोजी संपली होती. त्यानंतर आणखी दोन दिवस मुदत वाढवून देण्यात आली. त्यानंतर शनिवार आणि रविवार या दोन दिवसात नागरिकांनी स्वताहून आपली अनधिकृत बांधकामे हटवली. काही अनधिकृत बांधकामे तशीच होती. या उर्वरित बांधकामांवर आज बुलढोझर फिरवण्यात आला.