रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे बोगस फेसबुक खाते, एम. देवेंदर सिंह यांनी केले आवाहन

देवेंदर सिंग, देवेंदर सिंग आयएएस,रत्नागिरी कलेक्टोरेट अशा नावाने बोगस फेसबुक खाते तयार करुन फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली जाते आणि त्याद्वारे बँकखाते नंबर व मोबाईल नंबर मागविला जातो किंवा जुने फर्निचर, साहित्य विक्री ची माहिती देवून ते खरेदीसाठी प्रवृत्त केले जाते.

अशा प्रकारे आतापर्यंत अनेकवेळा वेगवेगळ्या नावाने बनावट खाते तयार करून फ्रेंड रिक्वेस्ट केली जात असल्याने याबाबत वेळोवळी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सायबर पोलीस स्टेशनकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, त्याची चौकशी सुरू आहे. यासंदर्भात नागरिकांची फसवणूक होऊ नये म्हणून वरीलप्रमाणे फेसबुक अकाउंट वरुन फ्रेंड रिक्वेस्ट प्राप्त झाल्यास, फोन करुन एम. देवेंदर सिंह, जिल्हाधिकारी रत्नागिरी अशा नावाने मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर आणि बँक अकाउंट नंबर विचारल्यास, किंवा अन्य वस्तू खरेदी-विक्री साठी विचारणा केल्यास कोणतीही माहिती देण्यात येवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी एम. देवेंदर सिंह यांच्या नावाने अशा प्रकारे कोणतीही माहिती फेसबुक खात्याद्वारे मागविली जात नाही. यांसदर्भात फेसबुक द्वारे किंवा फोन द्वारे जनतेला अशा प्रकारच्या माहितीची विचारणा केल्यास आवश्यक वाटल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाकडे खात्री करणेत यावी.