वाजत-गाजत गौराईचं आगमन, कोकणात मंगलमय वातावरण

रत्नागिरी जिल्ह्यात मंगलमय वातावरणात घरोघरी गणेशोत्सव सुरू आहे.आज मंगळवारी सायंकाळी वाजत-गाजत गौराईचे आगमन झाले.गावाग्वात पारंपारिक पध्दतीने गौराईची पुजा करण्यात आली.उद्या घरोघरी सण साजरा केला जाणार आहे.
शनिवारी गणपती बाप्पाचे आगमन झाले.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 1 लाख 66 हजार 986 घरगुती आणि 116 सार्वजनिक गणेशोत्सवाच्या गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. तीन दिवस मनोभावे बाप्पाची पुजाअर्चा केल्यानंतर आज मंगळवारी वाजत-गाजत गौराईचे आगमन झाले.उद्या घरोघरी भक्तीभावाने गौराईची पुजा होणार आहे.गुरूवारी वाजत-गाजत गौरी गणपतीचे विसर्जन होणार आहे.