खोपी गावात लागलेल्या वणव्यात चार घरे जळून खाक

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात खोपी गावातील चार घरे वणव्यात जळून खाक झाली आहेत.आगीत कोणतीही जीवित हानी झालेली नाही.मात्र घरातील सर्व वस्तू,कपडे जळून खाक झाले आहेत. शासनाने या कुटुंबाना मदत करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

खोपी गावात डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या जाभलेवाडीत लागलेल्या वणव्यात चार घरे जळाली.गावात पाणी टंचाई असल्याने येथील कुटुंबे पाण्याच्या ठिकाणी स्थलांतरीत झाली होती.त्याचवेळी घरे बंद असताना लागलेल्या वणव्यात या चार घरांनी पेट घेतला.या कुटुंबांना सरकारने मदत करावी अशी मागणी करण्यात येत आहे.