
रत्नागिरीतील संगमेश्वरच्या दौऱयावर असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यावर मधमाशांनी हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्याने अजितदादांसह त्यांचे सुरक्षारक्षक आणि कर्मचाऱयांची एकच पळापळ झाली. दादांना सुरक्षितपणे गाडीत बसवताना अनेक पोलीस आणि अधिकाऱयांना मात्र मधमाशांनी चावा घेतला.
छत्रपती संभाजी महाराज यांना ज्या सरदेसाई वाडय़ात मुघलांनी घेरून पकडले होते त्या वाडय़ाची पाहणी करण्यासाठी अजित पवार संगमेश्वर कसबा येथे दौऱयावर होते. सरदेसाई वाडय़ाची पाहणी करत असतानाच अचानक मधमाशांनी हल्ला केला. चारी बाजूंनी घोंघावत आलेल्या मधमाशा पाहताच सुरक्षारक्षकांची तारांबळ उडाली.