विधानसभा निवडणूकीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात पाच विधानसभा मतदार संघात एकूण 65.23 टक्के मतदान झाले.2019 च्या विधानसभा निवडणूकीपेक्षा यंदाच्या निवडणूकीत जिल्ह्यात चार टक्के अधिक मतदान झाले आहे.2024 च्या विधानसभा निवडणूकीत रत्नागिरी जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढला आहे. जिल्ह्यात 13 लाख 23 हजार 413 मतदारांपैकी 4 लाख 27 हजार 363 पुरुष तर 4 लाख 46 हजार 470 महिला व 4 इतर मतदार अशा एकूण 8 लाख 73 हजार 837 मतदारांनी काल मतदान केले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी बुधवारी रत्नागिरी जिल्ह्यात शांततेत मतदान झाले.जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात मतदारांनी मतदानासाठी उत्साह दाखवला.2019 च्या विधानसभा निवडणूकीपेक्षा यंदाच्या विधानसभा निवडणूकीत जिल्ह्यात मतदान वाढले.2019 च्या विधानसभा निवडणूकीत रत्नागिरी जिल्ह्यात 61 टक्के मतदान झाले होते.2024 च्या विधानसभा निवडणूकीत जिल्ह्यात 65.23 टक्के मतदान झाले.त्यामुळे गत विधानसभा निवडणूकीपेक्षा रत्नागिरी जिल्ह्यात 4 टक्के मतादान वाढले आहे.विशेष म्हणजे पाचही विधानसभा मतदार संघात 60 टक्क्याहून अधिक मतदान झाले आहे.सर्वाधिक मतदान चिपळूण मतदारसंघात 69.04 टक्के झाले आहे.सर्वात कमी मतदान गुहागर तालुक्यात 61.79 टक्के झाले आहे.त्याव्यतिरिक्त दापोलीत 66.84 टक्के,रत्नागिरीत 63.73 टक्के आणि राजापूरात 64.17 टक्के मतदान झाले आहे.
विधानसभा मतदार संघनिहाय काल झालेले मतदान पुढीलप्रमाणे –
दापोलीत पुरुष 94 हजार 979 , महिला 99 हजार 718 यांनी मतदान केले.
गुहागर-पुरुष 70 हजार 583 , महिला 79 हजार 374 यांनी मतदान केले.
चिपळूण-पुरुष 95 हजार 816 , महिला 94 हजार 776 यांनी मतदान केले.
रत्नागिरी- पुरुष 90 हजार 651 , महिला 94 हजार 938 इतर 4 यांनी मतदान केले.
राजापूर-पुरुष 75 हजार 334 , महिला 77 हजार 664 यांनी मतदान केले.
जिल्ह्यातील 4 लाख 27 हजार 363 पुरुष तर 4 लाख 46 हजार 470 महिला व 4 इतर मतदार अशा एकूण 8 लाख 73 हजार 837 मतदारांनी काल मतदान केले.