लोकशाही दिनातील प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढा,जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांची सूचना

लोकशाही दिनात आलेले अर्ज ज्या विभागाकडे प्रलंबित आहेत, ते तात्काळ निकाली काढावेत, त्याबाबत केलेल्या कृती अहवालाची माहिती शुक्रवारपर्यंत द्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज झालेल्या लोकशाही कार्यक्रमात पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदींसह विभागप्रमुख उपस्थित होते.

उपजिल्हाधिकारी सर्वसाधारण शुभांगी साठे यांनी जिल्हास्तरीय लोकशाही दिनातील प्रलंबित अर्जांची माहिती दिली. त्यानंतर लोकशाही दिनात प्राप्त अर्जांची माहिती दिली. संबंधित विभागाने प्राप्त अर्जांवर केलेला कृती अहवाल शुक्रवारपर्यंत सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

सेवा हक्क कायदा अंतर्गत अर्ज वेळेवर निपटारा करा

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम सेवा हक्क कायदा 2015 अंतर्गत प्रलं‍बित असणाऱ्या अर्जांचा निपटारा वेळेवर करावा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी सिंह यांनी दिल्या. लोकशाही दिनानंतर याबाबत बैठक झाली. उपजिल्हाधिकारी श्रीमती साठे यांनी यावेळी संगणकीय सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली. प्रलंबित प्रकरणे असणाऱ्या विभाग प्रमुखांना पत्र पाठवा. तसेच, अपिलीय निकाली काढावीत, असेही ते म्हणाले.