
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर बावनदीजवळ सळई वाहतूक करणाऱ्या ट्रकला भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात दोघा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती घटनास्थळावरून पोलीस सुत्रांनी दिली.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. वेगवेगळ्या स्तरावर याबाबत ओरड सुरू आहे. कालपासून बांधकाम मंत्र्यांकडून रखडलेल्या या महामार्गाच्या कामाची पाहणी देखील सुरू झाली आहे. अशातच शुक्रवारी सकाळी बावनदीनजीक ट्रकच्या झालेल्या भीषण अपघातात दोन जणांनी आपला जीव गमावला आहे.