छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रत्नदुर्ग गडावर तळीरामांचा वावर वाढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कारण गडाच्या पायथ्याशी असलेलल्या हनुमान स्टॉप समोर दारुच्या बाटल्यांचा खच आढळूण आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी 1670 साली आदिलशहाकडून रत्नदुर्ग किल्ला जिंकून घेतला होता. त्यामुळे या गडाला ऐतिहासीक महत्व असून हे स्वराज्याचे वैभव जपणं हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. परंतु या सर्व गोष्टींना हरताळ पासून गडाच्या आवारात दारुच्या बाटल्या टाकून गडाचे पावित्र्य व ऐतिहासिक महत्वाला बाधा आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या भागातील वीज गेली असताना हे कृत्य करण्यात आले आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण होते. असा प्रकार पुन्हा घडू नये, तसेच लवकरात लवकर याचा बंदोबस्त करण्यात यावा व गडाचे पावित्र्य राखण्यासाठी शासनाच्या माध्यमातून उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.