
वर्षभरापासून आयटी (तंत्रज्ञान) क्षेत्र मंदीच्या कचाटय़ात सापडले आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपातीच्या नावाखाली लाखो तरुणांना नोकरीवरून काढून टाकले आहे. यामुळे जगभरातील दोन लाख तरुण बेरोजगार झाले आहेत. परंतु, बेरोजगारीच्या संकट काळात टाटांची दिग्गज पंपनी देशातील तरुणांना मोठी खुशखबर घेऊन आली आहे. चालू आर्थिक वर्षात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस 40,000 फ्रेशर्ससाठी रोजगाराच्या संधी देणार आहे. म्हणजे पंपनी दररोज सुमारे 110 फ्रेशर्सना नोकऱया देईल. देशातील तरुणांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. जगभरातील आयटी क्षेत्रात महत्त्वाचे बदल होत असताना टाटा समूहाची दिग्गज आयटी पंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. याआधी जून तिमाहीत म्हणजेच तीन महिन्यांत पंपनीने 5,000 हून अधिक लोकांना नोकऱया देऊन कर्मचारी वाढवले होते. यापूर्वी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने जून तिमाहीत 5,452 कर्मचारी जोडले असल्याची माहिती दिली. यासह पंपनीच्या एकूण कर्मचाऱयांची संख्या 6,06,9988 झाली आहे.
एआयचा सामना करण्यासाठी तरुणांनी तयार रहावे
कौशल्य भरलेले आहे, हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे. या प्रतिभेला आम्हाला भविष्यात भूप फायदा होईल. काwशल्य विकास कार्यक्रम चालवून आणखी सुधारणा करता येईल. म्हणूनच आम्ही फ्रेशर्सना जास्तीत जास्त संधी देऊ इच्छित आहोत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) प्रभावाचा सामना करण्यासाठी तरुणांना तयार राहावे लागेल, असे पंपनीचे मुख्य एचआर ऑफिसर मिलिंग लक्कड यांनी म्हटले.