Ratan Tata यांचा लाडका ‘Goa’ जेव्हा त्यांना अखेरचं भेटायला आला, का पडलं त्याला हे नाव? वाचा सविस्तर…

रतन टाटा आणि त्यांचे श्वान प्रेम साऱ्या हिंदुस्थानाला प्रचलित आहे. त्यांनी कुत्र्यांना कुटुंबाचा एक भाग मानले होते. त्याची प्रचिती आज अंत्यदर्शनावेळी सर्वांनाच आली. रतन टाटा यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी वरळी येथील NCPA ग्राऊंडमध्ये ठेवण्यात आले होते. यावेळी त्यांचा लाडका श्वान ‘गोवा’ रतन टाटा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी दाखल झाला होता. हे दृश्य पाहून उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले होते.

हिंदुस्थानाचेच नव्हे तर जगभरातील नामांकित आणि दानशूर उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 वर्षी मुंबईत निधन झाले. त्यांच्या निधनामुळे उद्योगविश्वासह हिंदुस्थानावर शोककळा पसरली आहे. वरळी येथील शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांचा लाडका श्वान ‘गोवा’ NCPA ग्राऊंडमध्ये आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, 11 वर्षांपूर्वी टाटा कंपनीचे कर्मचारी कामानिमित्त गोव्याला गेले होते. तेव्हा रस्त्यावर त्यांना एका कुत्र्याचे पिल्लू मिळाले. रतन टाटा त्याला घेऊन मुंबईत आले. तेव्हापासून गोवा रतन टाटा यांच्या निवासस्थानी राहत आहे. हा गोवा त्यांना गोव्याला सापडला म्हणून त्याचे नाव ‘गोवा’ असे ठेवण्यात आले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

रतन टाटा यांचे श्वानांवर विशेष प्रेम आहे आणि त्या प्रेमाखातर त्यांनी नवी मुंबईमध्ये कुत्र्यांसाठी 165 कोटी रुपये खर्च करून 5 मजली रुग्णालय सुद्धा सुरू केले आहे. कुत्र्यांना मी माझ्या कुटुंबाचा एक महत्वपूर्ण भाग मानतो, असे त्यांनी रुग्णालयाच्या उद्घाटनावेळी सांगितले होते.